तुम्हाला भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअर करायचे आहे का? तर मग जगात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या हवाई दलात अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी तुमच्या हाती आली आहे. भारतीय संरक्षण दलाच्या ५ मुख्य विभागांपैकी एक भारतीय वायुसेना वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची आणि देशासाठी हवाई युद्ध करण्याची जोखीम सांभाळते. निडर, धाडसी आणि जाँबाज अधिकारी हे या दलाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल हे जगातल्या ५ उत्कृष्ट दलांपैकी एक मानले जाते.
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी दि. ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ जुलै २०२४ असून, या तारखेला रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा १८ ऑक्टोबरपासून पुढे होणार आहे.
* भारतीय हवाई दलात बना अग्निवीर !
भारतीय हवाई दलात भरतीसाठी असलेली वयोमर्यादा पुढीलप्रमाणे : अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १७.५ वर्षे ते कमाल वय २१ वर्षे यादरम्यान असावे. या वयोगटातील उमेदवार भारतीय हवाई दलात भरतीसाठी पात्र असतील.
* शैक्षणिक पात्रता :
१) उमेदवाराला १२ वी परीक्षेत किमान ५०% गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयात ५०% गुण असणे अनिवार्य आहे किंवा ३ वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान) ५०% गुणांसह आणि डिप्लोमा कोर्समध्ये इंग्रजीत 50% गुणांसह उमेदवार उत्तीर्ण असावा. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून एकत्रित 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह गैर-व्यावसायिक विषय भौतिकशास्त्र आणि गणितासह २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम.
२) विज्ञान विषय वगळून : ५०% गुणांसह १०+२ इंटरमिजिएट आणि इंग्रजीमध्ये उमेदवाराला ५०% गुण असावेत.
३) इंग्रजी विषयामध्ये ५०% आणि ५०% गुणांसह २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
* नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१) दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका
२) बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा आवश्यक संबंधित विषयातील अंतिम वर्षाची गुणपत्रिका
३) नवीन पासपोर्ट साईज फोटो
४) उमेदवाराचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
५) उमेदवाराची स्वाक्षरी
६) उमेदवार १८ वर्षाच्या खालील असेल तर पालकांचा फोटो आणि पालकांच्या स्वाक्षरीचा फोटो.
७) परीक्षेसाठी ५५० रु. शुल्क तसेच GST शुल्क आकारले जाईल.
भारतीय हवाई दलात सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज, तसेच याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://agnipathvayu.cdac.in या वेबसाईटला भेट द्यावी. जय हिंद !