blog Images

मुला-मुलींना 'या' योजनेमुळे सैन्यदलात करिअरची मोठी संधी !

10 December 2022

  सैन्यदलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना 'अग्निपथ' योजनेंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारा  देशातील तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने  'अग्निपथ योजना' ही नवीन योजना सुरू केली आहे.
  देशातील अनेक तरुणांचे भारतीय संरक्षण क्षेत्रात दाखल व्हावे, हे स्वप्न असते. या तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ या योजनेअंतर्गत ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. ४ वर्षानंतर या तरुणांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या युवकांना अग्निवीर म्हटले जाईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यापैकी २५% अग्निवीरांना कायम केले जाईल. अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मी, नेव्ही व एअरफोर्स या तीनही विभागांमध्ये भरती केली जाईल.
मुला-मुलींनो, तुमचे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे असेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.

योजनेचे उद्दिष्ट-
सैन्यदलात सामील होऊन देशसेवा करण्याची तळमळ असलेल्या अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. देशातील हजारो तरुणांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे.    

पगार -
'अग्निपथ' या योजनेत अग्निवीर म्हणून निवड झालेल्या तरुणांना मासिक पगारासह ( अग्निपथ योजना वेतन ) इतर फायदेही दिले जातील. 

▪ अग्निवीरास पहिल्या वर्षी सुमारे ४.७६ लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल.
▪ चौथ्या वर्षी सुमारे ६.९२ लाख रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
▪ महिन्याला जवळपास रू. ५० हजार वेतन अग्निवीरास असेल.
▪ अग्निवीरास ४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर तिमाही निधी म्हणून ११ लाख रुपये दिले जातील, जे करमुक्त सेवा निधी पॅकेज असेल.

लाभ व वैशिष्ट्ये-
▪  देशातील तरुणांनी संरक्षण दलात सामील व्हावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे.
▪ या योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाईल.
▪ या अग्निवीरांचा कार्यकाळ ४ वर्षांचा असेल, त्यानंतर त्यांना दिलासा मिळेल.
▪ यापैकी 25% अग्निवीरांना कायम करण्यात येणार आहे.
▪ अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तिन्ही सैन्यात तरुणांची भरती केली जाईल.
▪ अग्निवीरांसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची आणि त्यांच्या देशाचे रक्षण करण्याची सुवर्णसंधी.
▪ देशभरात क्षमता व गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाईल.
▪ अग्निवीरांना सध्याच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रांवर कठोर लष्करी प्रशिक्षण दिले जाईल.
▪ डोंगरापासून वाळवंट, पाणी, जमीन, हवा अशा सर्व ठिकाणी तरुणांना सेवा करण्याची संधी दिली जाईल.
▪ अग्निपथ योजना 2022 अंतर्गत , अग्निवीरांना जोखीम आणि त्रासाशी संबंधित सर्व प्रकारच्या भत्त्यांचा लाभ दिला जाईल.
▪ अग्निवीरांना ४८ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाईल.
▪ सेवेत असताना अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
▪ अपंगत्व आल्यास भरपाई दिली जाईल.
▪ ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्व अग्निवीरांना सेवानिधीचा हक्क मिळेल.
▪ नियमित झाल्यावर नियमित शिपाई तत्वावर पगार दिला जाईल. विद्यमान नियमांनुसार पेन्शन लाभ.
▪ महिला अग्निपथ योजनेसाठी अर्ज करू शकतात.
▪ अग्निवीर दरवर्षी ३० दिवसांची रजा घेऊ शकतो.
 
निवड प्रक्रिया-
▪ इच्छुक महिला/पुरुष उमेदवारांना अर्ज करावा लागेल. 
▪ कठोर निवड प्रक्रियेतून आणि पारदर्शकतेने निवड केली जाईल. 
▪ उमेदवाराची कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.
▪ अग्निवीरला सध्याच्या प्रशिक्षण केंद्रांवर कठोर प्रशिक्षण दिले जाईल. 
 
अग्निवीरसाठी पात्रता-
अग्निपथ योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे.
 
▪ अर्ज करणारी व्यक्ती भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा .
▪ अर्जदार किमान इयत्ता १० वी  किंवा १२ वी पास असावा.
▪ तुम्हाला आरोग्याशी संबंधित सर्व पात्रता पूर्ण कराव्या लागतील.
▪ अर्जदाराचे वय १७.५  ते २१ वर्षे दरम्यान असावे.
▪ यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
 
  महाराष्ट्रातील अग्रणी संस्था 'डिफेन्स करिअर अकॅडमी' अनेक युवक-युवतींचे सैन्यदलात करिअरचे स्वप्न पूर्ण करीत आहे. आपणही सैन्यात अधिकारी होऊ इच्छित असाल तर एकवेळ अवश्य भेट द्या !