blog Images

युवक-युवतींनो, भारतीय सेनेत घडवा अभिमानास्पद करिअर...!

03 December 2021

  दहावी-बारावीनंतर युवक-युवतींसमोर करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, तर कोणाला इंजिनिअर...! भारतीय सेनेत अभिमानास्पद करिअर घडविण्याचीही अनेकांची इच्छा असते, पण भारतीय सेनेतील करिअरच्या प्रमुख संधी आणि तिकडे जाण्याचा मार्ग याविषयी अद्यापही हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यासाठीच हवा असतो एक प्रमुख मार्गदर्शक,  सैनिकी सेवेत प्रवेशाचा मार्ग दाखवणारा, आपणास शारीरिक आणि मानसिकरीत्या सर्वच दृष्टीने घडवणारा आणि वेळोवेळी आपल्यातील उमेदीला जागृत ठेवणारा. अनेक वर्षांपासून `डिफेन्स करिअर अकॅडमी` (DCA) देशाच्या सेवेसाठी बळकट खांद्याचे आणि मजबूत इराद्याचे सैनिक घडविण्याचे कार्य करीत आहे. 

  प्रत्येकाला सैनिकी वर्दीचे आकर्षण असते. सैनिकी अधिकारी होण्याचे मनातले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी कठोर मेहनत आणि सखोल अभ्यासाची गरज आहे. भारतीय सेनेत प्रवेश घेऊन राष्ट्राची सेवा करू इच्छिणाऱ्या आणि चमकदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना याविषयीचा अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षांसंबंधीची संपूर्ण माहिती असायला हवी. दहावी-बारावी झाल्यावर अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुढे काय करावे, असा प्रश्न पडतो. मुला-मुलींच्या पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी सैनिकी सेवेच्या अनेक संधी आहेत, परंतु या परीक्षांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांना फारशी माहिती नसते. खरे पाहता, डॉक्टर आणि इंजिनिअर बनूनही तुम्ही भारतीय सेनेच्या माध्यमातून देशाची सेवा करू शकता. याद्वारे शाश्वत, प्रतिष्ठित व गौरवशाली आयुष्य जगण्याची संधी मिळते. भारतीय सैनिकी सेवेत सामील होण्याचा प्रमुख मार्ग आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) प्रवेश परीक्षेचा. NDA मध्ये प्रवेश मिळणे अत्यंत सन्मानाचे समजले जाते. NDA चा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची पुढे भूदल, नौदल आणि हवाईदलात अधिकारी म्हणून निवड होते. भारतीय सेनादलाच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून, इंडियन नेव्हल अकॅडमी केरळ आणि इंडियन एअरफोर्स अकॅडमी हैद्राबाद या ठिकाणीही प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. NDA साठीच्या प्रवेश परीक्षेला कला, वाणिज्य वा विज्ञान विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ही प्रवेश परीक्षा दरवर्षी घेतली जाते. परीक्षेची प्रश्नपत्रिका ही पाचवी ते बारावीदरम्यानच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. लेखी परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी हे दोन प्रमुख घटक या परीक्षेत असतात. युवक-युवतींना जीवनात अभिमानास्पद करिअर घडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भारतीय सैनिकी सेवा. `डिफेन्स करिअर अकॅडमी`च्या माध्यमातून तुमचे हे स्वप्न साकार होऊ शकते. 

  आता तर युवतींसाठीही NDA प्रवेश परीक्षेचा मार्ग खुला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निकालानुसार, मुलीही आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) प्रवेश परीक्षेला पात्र असतील. कर्तबगार युवतींसाठी NDA द्वारे सैनिकी सेवेत करिअरची ही खरोखर सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करात आव्हानात्मक करिअरचे अनेक पर्याय खुले आहेत. `डिफेन्स करिअर अकॅडमी` (DCA) यासाठी संपूर्ण तयारी करून घेते. 
अशा आहेत युवक-युवतींसाठी भारतीय सैन्यात करिअरच्या संधी...
NDA-NA / JEE / NEET / AFMC / MHT CET / IMU CET / MERCHANT NAVY / CIVIL AVIATION / SSB ११ वी आणि १२ वीच्या सामान्य शिक्षणासह UPSC / CDSE / AFCAT, ASST. COMMANDANT / ARMY / NAVY / AIR FORCE, 
५ वी ते १० वी (CBSE बोर्ड) सैनिकी प्रशिक्षण, यात NTSE / MTSE / SSE, KVPY और NDA, AFMC FOUNDATION आणि इतरही स्पर्धा परीक्षांचा समावेश होतो. 

  सामान्य शिक्षणासह सैनिकी सेवेत करिअर घडविणारी डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. DCA मध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन अनेक कॅडेट्स भारतीय सैन्यात अधिकारी आणि इतर पदांसह विविध क्षेत्रात सेवा बजावत आहेत. आता डिफेन्स करिअर अकॅडमीने (DCA) स्वतंत्र कॅम्पस आणि स्टाफसह केवळ युवतींसाठी सैनिकी प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे युवतींना संरक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही. 

  भारतीय सैनिकी सेवेत उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी त्वरेने पाऊले उचलून आजच डिफेन्स करिअर अकॅडमीला (DCA) भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. हीच तर खरी वेळ आहे मुला-मुलींच्या करिअरला सुबक आकार देण्याची...!    
जय हिंद...!