blog Images

मुलींनो, उच्च शिक्षणातूनच घडवता येईल भवितव्य...!

07 December 2021

  लहानपणी शाळेत असताना, `काय गं मोठी झाल्यानंतर तू कोण होणार...` असा कोणी प्रश्न विचारला तर झटक्यात आपणही उत्तर देतो, डॉक्टर, इंजिनिअर वगैरे...! पण जसजसा काळ सरत जातो, तसतसे हे स्वप्न एकतर अधिक स्पष्ट होऊ लागते किंवा ते धूसर होत जाते. यास कारणीभूत ठरते आपल्या आसपासची परिस्थिती आणि अडचणी. यशस्वितेच्या वाटेत येणारी ही संकटे पार करण्याचे सामर्थ्य मिळते शिक्षणातून. त्यामुळेच जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षण हा मानवी समाज विकासाचा मुख्य स्रोत आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते, त्या कुटुंबाची प्रगती होते. म्हणून प्रत्येक मुलीने पदवी शिक्षण घ्यायला हवे. उज्ज्वल भवितव्याचा मार्ग उच्च शिक्षणातूनच सापडतो, हे मुलींनी आणि त्यांच्या पालकांनीही लक्षात घ्यायला हवे. 

  समाजात आजही मुलींच्या शिक्षणाकडे पाहिजे तेवढे लक्ष पुरविले जात नाही. शिक्षणाबाबत मुलगा आणि मुलगी असा दुजाभाव केला जातो. दहावी-बारावी झाल्यानंतर लगेच मुलीचे लग्न करून देण्यावर पालकांचा भर असतो. देश स्वतंत्र होऊन मोठा काळ उलटला तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी पालकांची भूमिका अजूनही बदललेली नाही. हे चित्र बदलायचे असेल तर समाजात आजही पुढाकार घेण्याची गरज भासते. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी नेत्रदीपक प्रगती केलीय हे खरे, पण याची दुसरी बाजूही तपासावी लागेल.  

  दहावी-बारावीनंतर मुलींना शिकवायचे तर त्यासाठी कॉलेजही जवळ असावे, असा पालकांचा विचार असतो. त्यात काही गैर नाही. पालकांची  ही अडचण ओळखून मुलींच्या शैक्षणिक हक्कासाठी पुढाकार घेणाऱ्या मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित DCA संस्थेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे... `डिफेन्स करिअर अकॅडमी सीनिअर कॉलेज फॉर गर्ल्स`च्या रूपाने. येथे मुलींना निर्भय वातावरणात पदवी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. मुलींना अभ्यास आणि मेहनतीतून येथे शासनमान्य एसएनडीटी विद्यापीठाची पदवी प्राप्त करता येईल. जीवनात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुलींनी `DCA सीनिअर कॉलेज फॉर गर्ल्स` येथे अवश्य प्रवेश घ्यावा. आपल्या मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकांनीही एकदा येथे भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा इथल्या अभ्यासपूर्ण वातावरणाचा. येथे मुलींना सामान्य शिक्षणासह भारतीय सेनेत अभिमानास्पद करिअर घडविण्याची सुवर्णसंधी मिळते. भारतीय सेनेतील करिअरच्या प्रमुख संधी आणि तिकडे जाण्याचा मार्ग, त्यासाठीची तयारी, सखोल मार्गदर्शन उपलब्ध होते. 
  
  शिक्षण क्षेत्रात `DCA सीनिअर कॉलेज फॉर गर्ल्स`चे नाव आदराने घेतले जाते. महाविद्यालयाला उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. येथे येण्यासाठी सुरक्षित बस सुविधा आहे. सामान्य अभ्यासक्रमासह येथे मुलींना स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य ग्रंथालय आणि संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. मुलींकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी येथे इनडोअर आणि आऊटडोअर गेम्स घेतले जातात. अभ्यासाव्यतिरिक्त मुलींना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, खो-खो, फुटबॉल यासारखे खेळही खेळता येतील. मुलींच्या आरोग्याकडेही येथे लक्ष दिले जाते. त्यासाठी अत्यावश्यक हॉस्पिटलायझेशन सुविधा आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असावे, यासाठी नियमित उपक्रम घेतले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मैत्रीभावना वाढवली जाते. कलागुण जोपासण्यासाठी चित्रकला, गायन, संगीत विभाग आहे. भारतीय सेनेत आव्हानात्मक करिअरचे अनेक पर्याय खुले असतात. त्यासाठी मुलींना खास मार्गदर्शन केले जाते. त्याची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. 
    
  दहावी-बारावीनंतर मुलींना शिकवायचे असेल तर त्यासाठी `DCA सीनिअर कॉलेज फॉर गर्ल्स` हा सर्वोत्तम पर्याय आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी मुलींनी आणि त्यांच्या पालकांनीही एकदा महाविद्यालयाला आवर्जून भेट द्यावी आणि आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संचालिका श्रीमती ऊर्मिला केदार रहाणे यांनी केले आहे.