Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

080 474 95777 | 080 474 98777

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 9341959595 | +91 9343959595

blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 9341959595 | +91 9343959595 Kolhapur : +91 9341959595 | +91 9343959595
blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 9341959595 | +91 9343959595 Kolhapur : +91 9341959595 | +91 9343959595

जाणून घ्या AISSEE 2026 पास झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया

डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल (DCA)
---
शालेय वयापासूनच भारतीय सैन्यदलात उत्तुंग करिअरची सुरुवात करू इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात येणारी AISSEE 2026 एक्झाम अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण येथूनच वाटचाल सुरु होते धाडसी सैनिकी सेवेतील करिअरची. अशा अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी शिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल (DCA). गेल्या 17 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील 12 एकरांच्या क्षेत्रफळात शिस्तबद्ध सैनिकी शिक्षण देणाऱ्या डिफेन्स करिअर अकॅडमीला भारतीय संरक्षण मंत्रालय (भारत सरकार) आणि ऑल इंडिया सैनिक स्कूल सोसायटीद्वारे मान्यता मिळालेली आहे. या संस्थेत ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE 2026) पास झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वीमध्ये प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. 
चला, तर मग जाणून घेऊया ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE 2026) पास झाल्यानंतर कशी असते प्रवेश प्रक्रिया. 
---
ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE) 2026 ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर इयत्ता 6 आणि इयत्ता 9 वीमध्ये सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी NTA (National Testing Agency) द्वारे आयोजित केली जाते. परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील इयत्ता 6 वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील टप्पे महत्वाचे आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल आणि मेरिट लिस्ट तसेच रँक जाहीर केली आहे. आता ई-काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी मेरिट लिस्टमध्ये नाव असणे गरजेचे आहे. त्याद्वारेच पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येते. 

पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम AISSEE 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मेरिट लिस्ट आणि संपूर्ण निकाल तपासून पाहावा. या मेरिट लिस्टनुसार मिळवलेले मार्क्स आणि All India Rank (AIR) दिसून येतो. पुढच्या टप्प्याला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहता येते. 

त्यानंतर सुरू होते E-Counselling प्रक्रिया AISSAC नुसार ऑनलाईन सीट अलॉटमेंट. मेरिट लिस्टनंतर ई-काऊन्सेलिंग प्रोसेस (All India Sainik Schools Admission Counselling / AISSAC) सुरू होते. या प्रक्रियेत विद्यार्थी-पालकांना खालील गोष्टी कराव्या लागतात. 

*  ई-काऊन्सेलिंग पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करणे. त्यात सैनिक स्कूल प्राधान्य (School Preference) समाविष्ट करायचा असतो. तुम्हाला कोणत्या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवायचा आहे ते या ठिकाणी नमूद करावे लागते. मेरिटनुसार तुमच्या पसंतीलल्या स्कूलमध्ये जागा मिळते. पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. काऊन्सेलिंगमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना जागा मिळणे म्हणजे अंतिम प्रवेश नाही. प्रवेशासाठी पुढील टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे.

*  मेडिकल फिटनेस टेस्ट : काऊन्सेलिंगमध्ये जागा मिळाल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे मेडिकल / फिजिकल फिटनेस एक्झामिनेशन. यात नियुक्त वैद्यकीय अधिकारी विद्यार्थ्यांची मेडिकल तपासणी करतात. यात शरीराची सहनशक्ती, शारीरिक स्थिती, दृष्टी, श्रवणदोष इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. विद्यार्थी मेडिकल व फिजिकल टेस्टमध्ये फिट असल्यास पुढील टप्प्यात पुढे जाण्याची पात्रता मिळते.

*  मूळ कागदपत्रांची तपासणी : ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. शाळेत उपस्थित राहून सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणी करावी लागते.

*  प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे 
1) विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र 
2) AISSEE मेरिट लिस्ट / ऍडमिट कार्डची कॉपी
3) शालेय गुणपत्रक 
4) ट्रान्सफर सर्टिफिकेट 
5) डोमिसाईल प्रमाणपत्र
6) कॅटेगिरी प्रमाणपत्र
7) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट 
8) विद्यार्थ्याचे फोटो यासह इतर आवश्यक कागदपत्रे. 

*  अंतिम प्रवेश व शुल्क भरणा : जो विद्यार्थी मेडिकल व फिजिकली फिट सिद्ध झाला आहे आणि ज्याची सर्व कागदपत्रे योग्य व व्यवस्थित आहेत, अशा विद्यार्थ्यांना अंतिम प्रवेशासाठी निवडले जाते. त्यानंतर प्रवेश घेतलेल्या सैनिक स्कूलमध्ये तिथली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांनी त्या त्या सैनिक स्कूलचे शुल्क भरल्यानंतर, तसेच बोर्डिंग/हॉस्टेल सुविधा शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्चित होतो.  

उज्ज्वल करिअरचे स्वप्न साकार करणारी संस्था DCA 
भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअरचे हजारो युवक-युवतींचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीला (DCA) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून केंद्रीय सैनिकी शाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डिफेन्स करिअर अकॅडमीने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धाडस, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्ती रुजवल्यामुळे संस्थेचे अनेक विद्यार्थी आजघडीला भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदांवर यशस्वीपणे कर्तव्य बजावत आहेत. 

डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल (DCA) ही केवळ सैनिकी शिक्षण संस्था नसून, भारतीय सैन्यदलासाठी जांबाज अधिकारी घडविणारी एक मिशन आहे. सैन्यदलात सामील होऊन देशसेवा करण्याची आवड असलेल्या सर्व युवक-युवतींना या क्षेत्रातील विविध परीक्षांची माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, पूर्वतयारी आणि जोमदार सैनिकी प्रशिक्षणाची सुविधा डिफेन्स करिअर अकॅडमी प्रदान करते. भारतीय सेनेसाठी आजवरच्या कार्यकाळात संस्थेने अनेक सैनिकी अधिकाऱ्यांसह असंख्य जवान, इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स घडवले आहेत. NDA मध्ये प्रवेश मिळवण्याचे अनेक विद्यार्थी व पालकांचे स्वप्न DCA ने साकार केले आहे. 

 
ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE) 2026 पास झाल्यानंतर इयत्ता ६ वीसाठी DCA मध्ये प्रवेश घेण्याची सर्वोत्तम संधी आता पालक आणि विद्यार्थ्यांना लाभली आहे. शालेय वयापासूनच मुलामुलींच्या स्वाभिमानी करिअरला आकार देण्यासाठी आजच DCA च्या छत्रपती संभाजीनगर कॅम्पसला नक्की भेट द्या...!  

ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE) 2026 नंतरच्या प्रवेशासाठी आमच्या dcass.org या वेबसाईटला भेट द्या. 

जय हिंद ! 

Online Enquiry WhatsApp Youtube