Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

080 474 95777 | 080 474 98777

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 9341959595 | +91 9343959595

blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 9341959595 | +91 9343959595 Kolhapur : +91 9341959595 | +91 9343959595
blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 9341959595 | +91 9343959595 Kolhapur : +91 9341959595 | +91 9343959595

DCA मध्ये सैनिकी प्रशिक्षणाद्वारे घडवा अभिमानास्पद करिअर !

युवक-युवतींनो, तुमच्या मनात राष्ट्राप्रती प्रखर प्रेम आहे. तुमच्या मनातही देशभक्तीची ज्वलंत मशाल पेटलेली आहे. देशासाठी काही तरी भव्यदिव्य करण्याची इच्छा तुमच्या मनातही आहे... त्यासाठी कठोर प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे... पण भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअरच्या विविध संधी आणि नेमकी दिशा तुम्हाला माहीत आहे का? मराठवाड्यात अनेक जिगरबाज तरुण-तरुणी आहेत, पण फक्त सैनिकी करिअरची योग्य दिशा न मिळाल्यामुळे भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. पण यापुढे असा स्वप्नभंग होणार नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासह शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अग्रणी असलेली डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) तुमच्यासोबत असेल. महाराष्ट्रातील युवकांचे सैनिकी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) ही संस्था अविश्रांत मेहनत घेत आहे. डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक तथा डिफेन्स करिअर कोच प्रा. डॉ. केदार रहाणे सर आपल्या संपूर्ण प्रशिक्षित स्टाफसह विद्यार्थ्यांना अखंड मार्गदर्शन करीत आहेत. डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) मध्ये आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हीही वेळ न घालवता, आजच डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) च्या भव्य कॅम्पसला भेट द्या ! सैनिकी अधिकारी होण्याच्या दिशेने हे तुमचे पहिले पाऊल असेल !
---
आजघडीला डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) येथून कठोर प्रशिक्षण घेऊन साधारण २२०० हून अधिक विद्यार्थी भारतीय सेनेत वेगवेगळ्या उच्च पदांवर सेवा बजावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने NDA, इंडियन नेव्ही, पायलट, मर्चंट नेव्ही, सरकारी नोकरी, इंडियन आर्मी, डॉक्टर, पॅरामिलिटरी फोर्स, एअरफोर्स आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात DCA कॅडेट्स अभिमानास्पद कामगिरी करीत आहेत.
* डिफेन्स करिअर अकॅडमीविषयी थोडक्यात
१) सर्व सुविधांनी सुसज्ज निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय
२) १२ एकरांचा विस्तीर्ण कॅम्पस
३) ५ वी ते १० वी CBSE आणि State Board (इंग्रजी माध्यम)
४) ११ वी, १२ वी महाविद्यालयीन शिक्षणासह NDA-NA / JEE MAIN / NEET तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी !
५) मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल
६) अॅडव्हेंचर ट्रेनिंगसह सैनिकी प्रशिक्षण व उज्ज्वल करिअरसाठी सखोल मार्गदर्शन
----------
* भारतीय सेनेत उज्ज्वल करिअरसाठी DCA का सर्वोत्तम आहे?
* सर्वोत्कृष्ट हॉस्टेल सुविधा
डिफेन्स करिअर अकॅडमी संस्थेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे हॉस्टेल आहे. सर्वोत्कृष्ट सुविधांसह मुलामुलींची स्वतंत्र निवासी व प्रशिक्षण व्यवस्था आहे. याशिवाय ऍडव्हान्स क्लासरूम्स, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, मैदानी खेळांची व्यवस्था, अद्ययावत जीम, पौष्टिक आणि रुचकर जेवणासाठी विशाल मेस, लाँड्री सुविधा अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
* करिअरची संपूर्ण तयारी
सैन्यदलातील करिअरच्या अनुषंगाने प्रभावी प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षा, SSB ट्रेनिंगची तयारी, शारीरिक कसरती आणि स्पोर्ट्समध्ये पॅरासिलिंग, माऊंटेनिंग, रॅपलिंग, योगा आणि मेडिटेशन, लष्करी प्रशिक्षणासह पर्सनालिटी डेव्हलपमेंट, कंपेटिटिव्ह इंग्लिश, JEE, IIT, NDA, CME आणि INS यांसारख्या स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी येथे करून घेतली जाते. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि स्टाफ
DCA मध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी २०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असून, त्याशिवाय वेळोवेळी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समधील उच्च अधिकाऱ्यांची गेस्ट लेक्चर्स होतात. प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
* मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था
DCA मध्ये मुलींसाठी विशेष व स्वतंत्र शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था आहे. मुलींच्या स्वतंत्र निवासी बिल्डिंगसह, संपूर्ण महिला स्टाफ आहे. त्यामुळे DCA मध्ये मुलींच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते.
* सर्व स्पर्धा परीक्षा
सैनिकी करिअर घडवण्यात अग्रेसर असलेल्या डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) संस्थेत विद्यार्थ्यांना सामान्य शिक्षणासह सैनिकी क्षेत्र, स्पर्धा परीक्षा यात तरबेज केले जाते. त्यासाठी NTSE / MTSE/ AISSEE / RIMC / Homi Bhabha व NDA-NA, AFMC FOUNDATION यासह इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. महाविद्यालयीन स्तरावर 11 वी आणि 12 वीसह (विज्ञान/वाणिज्य शाखा) NDA-NA / JEE / NEET / AFMC / MHT CET / IMU CET/ MERCHANT NAVY / CIVIL AVIATION या परीक्षांसह SSB Interview ची तयारी करून घेतली जाते. मुलींसाठी महाविद्यालयीन (B.Sc) शिक्षणासह UPSC / CDSE / AFCAT / ASST. COMMANDANT / ARMY / NAVY / AIR FORCE अशा विविध परीक्षांसाठी पारंगत केले जाते.
ठरलं तर मग आता भारतीय सेनेत करिअर करण्यासाठी डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) जॉईन करायची. विद्यार्थ्यांनो, DCA मध्ये आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी व 12 वीसाठी रविवार, 04 फेब्रुवारी 2024 रोजी आणि 11 वीसाठी रविवार, 21 एप्रिल 2024 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. तुम्हीही वेळ न घालवता, आजच पालकांसह डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) च्या भव्य कॅम्पसला भेट द्या !
अधिक माहिती व प्रवेशासाठी www.dcaedu.in या वेबसाईटला भेट द्या !
कॅम्पस - डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर (वडाची वाडी), खोजेवाडी फाटा, छत्रपती संभाजीनगर-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे), ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
आजच कॉल करा - 080-474-95777, 93439 59595

Online Enquiry WhatsApp Youtube