Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

+91 8047495777 | +91 8047498777

+91 9341959595 | +91 9343959595

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 7030259595 | +91 7030359595

Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 0705 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595
Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 07055 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595

DCA प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण परीक्षा 12 एप्रिल 2026 । 19 एप्रिल 2026

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही इंडियन आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये आर्मी ऑफिसर, इंजीनियर, पायलट, डॉक्टर बनायचे असेल, तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे तुमचे पहिले पाऊल, तुम्ही निवडलेली दिशा. जीवनात गौरवशाली करिअर करण्यासाठी तुमचे शिक्षणही त्याच दिशेने असायला हवे. तुम्ही केलेली कठोर मेहनत, तुमचा सखोल अभ्यास आणि तुम्हाला मिळालेले अचूक मार्गदर्शन या त्रिसूत्रीतून तुम्ही हे स्वप्न नक्कीच साकार करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना सर्वप्रथम शिक्षणाची दिशा ठरवावी लागेल. वर्ष 2026 च्या एप्रिल महिन्यातील दोन रविवार असे आहेत की, जे तुमच्या विद्यार्थी जीवनाला नवे वळण, नवी दिशा देऊ शकतात आणि त्यासाठी तुमची मार्गदर्शक संस्था असेल महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी शिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. 
 
महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षा 
डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल, छत्रपती संभाजीनगरमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी, तसेच 11 वी व 12 वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार, दि. 19 एप्रिल 2026 रोजी महत्वाची प्रवेश परीक्षा होत आहे. सकाळपासून सुरू होणारी ही प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सायंकाळपर्यंत चालेल. त्याच ठिकाणी तुमचा निकाल घोषित केला जाईल. आणि आनंदाची बाब म्हणजे, तुम्ही लगेचच डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश निश्चित करू शकता. DCA छत्रपती संभाजीनगर येथील प्रवेश परीक्षेचे स्थळ आहे : डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल, शहापूर बंजर, खोजेवाडी फाटा, AS क्लब ते लासूर स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.

DCA कोल्हापूरसाठी प्रवेश परीक्षा 
पालक आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर डिफेन्स करिअर अकॅडमीने कोल्हापूरमध्येही आपली शाखा सुरु केली आहे. DCA कोल्हापूरमध्येही तुम्हाला इयत्ता 5 वी ते 10 वी, तसेच 11 वी व 12 वीमध्ये प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठीची प्रवेश परीक्षा तारीख आहे रविवार, दि. 19 एप्रिल 2026. या ठिकाणची प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सकाळपासून सायंकाळपर्यंत चालेल. त्याच ठिकाणी तुमचा निकाल घोषित केला जाईल आणि लगेचच तुम्ही डिफेन्स करिअर अकॅडमी, कोल्हापूर संस्थेत प्रवेश निश्चित करू शकता. या प्रवेश परीक्षेचे स्थळ असे : DCA कोल्हापूर कॅम्पस, माय स्कूल, चौंडेश्वरी कॉटन मिलजवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, चिपरी, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
           
महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी शिक्षण संस्था 
भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअरचे हजारो युवक-युवतींचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीला (DCA) नुकतीच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून सैनिक स्कूल म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या DCA ने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धाडस, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्ती रुजविण्याचे कार्य केले आहे. आज डिफेन्स करिअर अकॅडमीतील (DCA) अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी भारतीय सैन्यात निरनिराळ्या प्रमुख पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने NDA, भारतीय नौसेना, पायलट, मर्चंट नेव्ही, सरकारी नोकरी, इंडियन आर्मी, डॉक्टर, पॅरामिलिटरी फोर्स, एअरफोर्स आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात येथील विद्यार्थी कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक वर्षी DCA चा हा आलेख उंचावत जात आहे. DCA मध्ये पाल्यांना CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोन्ही माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि निवासाच्या बाबतीत मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मुलींसाठी थेट पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा आहे. DCA मध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि सर्वोत्तम हॉस्टेल सुविधा उपलब्ध आहे. पौष्टिक जेवण, वैयक्तिक बेड, मॅटस्-पिलो, लॉकर्स, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आहे. तसेच लाँड्री सिस्टीम, अद्ययावत जिम याशिवाय येथे अनेक मूलभूत सुविधांसह मुलामुलींची स्वतंत्र निवासी व प्रशिक्षण व्यवस्था आहे. येथे भारतीय सैन्यदलात करिअरच्या अनुषंगाने कॅडेट्सना प्रभावी प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील प्रमुख स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाते. शारीरिक कसरती आणि मेडिटेशनचीही मदत घेतली जाते. मूलभूत लष्करी प्रशिक्षणासह NDA, CME आणि INS यांसारख्या स्पर्धा परीक्षा, SSB इंटरव्ह्यू, कंपेटिटिव्ह इंग्लिश, जेईई, आयआयटीची परिपूर्ण तयारी येथे करून घेतली जाते. DCA मध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 230 हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून, त्याशिवाय प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 

दीड दशकाची उज्ज्वल परंपरा 
डिफेन्स करिअर अकॅडमी ही केवळ एक शिक्षण संस्था नसून, भारतीय सैन्यदलासाठी जांबाज अधिकारी घडविणारी एक मिशन आहे. सैन्यदलात सामील होऊन देशसेवा करण्याची आवड असलेल्या सर्व युवक-युवतींना या क्षेत्रातील विविध परीक्षांची माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, पूर्वतयारी आणि जोमदार सैनिकी प्रशिक्षणाची सुविधा डिफेन्स करिअर अकॅडमी प्रदान करते. गेल्या 17 वर्षांपासून हजारो युवक-युवतींचे बलशाली भारतीय सेनेमध्ये उज्ज्वल करिअर घडविण्याचे कार्य डिफेन्स करिअर अकॅडमीचे (DCA) संचालक तथा डिफेन्स करिअर कोच प्रा. डॉ. श्री. केदार रहाणे करीत आहेत. आजवरच्या काळात त्यांनी असंख्य जवान, ऑफिसर्स, इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स यासह हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरला सुबक आकार दिला आहे. रविवार, दि. 12 एप्रिल 2026 व रविवार, दि. 19 एप्रिल 2026 रोजी अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रवेश परीक्षेस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन DCA संचालक तथा डिफेन्स करिअर कोच प्रा. डॉ. श्री. केदार रहाणे यांनी केले आहे. 

Online Enquiry WhatsApp Youtube