Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

+91 8047495777 | +91 8047498777

+91 9341959595 | +91 9343959595

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 7030259595 | +91 7030359595

Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 0705 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595
Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 07055 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595

डिफेन्स करिअर अकॅडमीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कॅम्पसमध्ये DCA कॅडेट्सची शिस्तबद्ध परेड

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था, तसेच भारतीय संरक्षण मंत्रालय व सैनिक स्कूल सोसायटीद्वारे मान्यताप्राप्त केंद्रीय सैनिक स्कूल डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) मध्ये ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा सोमवारी (ता. २६) अत्यंत उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैनिकी सेवेत सर्वोच्च कार्यगुणवत्तेबद्दल सेना पदक व विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित मेजर जनरल श्री. एस. एच. महाजन हे उपस्थित होते. यानिमित्ताने झालेली कॅडेट्सची शिस्तबद्ध परेड, राष्ट्रगीताचे स्वर, सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी-पालकांच्या गर्दीमुळे DCA च्या १२ एकरांच्या विशाल कॅम्पसमध्ये अपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.  
 
डिफेन्स करिअर अकॅडमीत झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा घेण्यात आला. त्यानंतर भारतमातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे मेजर जनरल एस. एच. महाजन यांना सशस्त्र मानवंदना देत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. DCA कॅडेट्सच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्षभरात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचे कौतुक करण्यात आले. NDA परीक्षेत भरीव यश मिळवणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना मेजर जनरल एस. एच. महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 
 
यावेळी बोलताना मेजर जनरल एस. एच. महाजन यांनी डिफेन्स करिअर अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. देशासाठी समर्पित, शिस्तबद्ध व सक्षम अधिकारी घडविण्यासाठी DCA करत असलेल्या कार्याची त्यांनी विशेष प्रशंसा केली. संस्थेतील कठोर प्रशिक्षण, शिस्त व मूल्याधिष्ठित शिक्षणामुळे विद्यार्थी भविष्यात भारतीय सैन्यदलात यशस्वी अधिकारी म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करताना मेजर जनरल एस. एच. महाजन यांनी, विद्यार्थ्यांना देशसेवा, कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रप्रेम या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. सैन्यदलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी DCA सारख्या संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक तथा डिफेन्स करिअर कोच प्रा. डॉ. श्री. केदार रहाणे, मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सोमीनाथजी रहाणे, सचिव श्री. सच्चिदानंद रहाणे, DCA गर्ल्स विंगच्या संचालिका सौ. उर्मिला केदार रहाणे, सीईओ श्री. उद्धव टकले, प्राचार्य श्री. श्रीकांत वरुडे, उपप्राचार्य श्री. बालकृष्णन, श्री. शशिकांत बडाख यांच्यासह शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.

Online Enquiry WhatsApp Youtube