Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

+91 8047495777 | +91 8047498777

+91 9341959595 | +91 9343959595

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 7030259595 | +91 7030359595

blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595 blog gif Schedule for Chh. Sambhajinagar Entrance Exam 2026-27
blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595 blog gif Schedule for Chh. Sambhajinagar Entrance Exam 2026-27

कणखर सैनिक घडविणारी संस्था - डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA)

भारतीय संरक्षण सेवेत जाण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, इत्यादी अनेक क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात. अश्यावेळी त्यांना गरज असते योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षणाची !
डिफेन्स करिअर अकॅडमी ही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एक नामांकित संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेचे प्रशिक्षण देऊन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मदत केली आहे.
डिफेन्स करिअर अकॅडमीचा उद्देश :
ही संस्था २००७-०८ पासून कार्यरत आहे. भारतीय संरक्षण सेवेमध्ये अधिकारी पदावर महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांना संरक्षण सेवेत अधिकारी पदावर नियुक्त व्हावे यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाची तयारी करून घेणे हा डिफेन्स करिअर अकॅडमीचा ऊद्देश आहे.
यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या म्हणजेच NDA, CDSE, AFCAT यांसारख्या परीक्षेस बसून आणि ती उत्तीर्ण होऊन पुढील SSB मुलाखतीची तयारी करून घेण्यासाठी आणि उमेदवाराची बौद्धिक व शारीरिक सर्वोतपरी तयारी स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यासाठी DCA कार्यरत आहे.
* DCA मध्ये प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
* इ. ५ ते १० इंग्रजी माध्यमात प्रवेशासाठी विद्यार्थ्याला DCA च्या प्रवेश परीक्षेत किमान ६०% गुण मिळविणे आवश्यक आहे.
* पदवी BSC (CDSE/AFCAT) साठी प्रवेश घेणारा उमेदवार १२वी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेला आणि ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
* DCA प्रवेश परीक्षा :
१) लेखी परीक्षा : 
DCA मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामान्यज्ञान हे विषय असतात.
२) तोंडी मुलाखत :
लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादीनुसार त्याच दिवशी विद्यार्थ्यांची तोंडी मुलाखत घेतली जाते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि व्यक्तिमत्व चाचणी तपासली जाते.
३) शारीरिक तपासणी :
लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी देखील केली जाते. ज्यामध्ये विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या निकोप असणे अनिवार्य आहे.
४)वैद्यकीय तपासणी :
DCA च्या विहित नमुन्यातील फॉर्म प्रमाणे कोणत्याही MBBS डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यास संस्थेला सादर करणे आवश्यक आहे.
* DCA मध्ये प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ?
* DCA मध्ये प्रवेशासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
* यासाठी DCA च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवाराची माहिती भरावी : http//dcaaurangabad.org
* वेबसाईडच्या होम पेजवर उजव्या बाजूला Online Admission Form वर क्लिक करावे.
* या नंतर आपला मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकावा.
* या नंतर SUBMIT बटन वर क्लीक करा.
* या नंतर Add New वर क्लिक करा,
* इथे आपली संपूर्ण माहिती भरावी व पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा.
* यानंतर NEXT या बटनावर क्लिक कराव.
* या पेजवर आपल्या पालकांची माहिती भरावी नाव, जन्म तारिख, शिक्षण, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न ई. आणि NEXT या बटनावर क्लिक करावे.
* यानंतर आपली Scanned Signature आणि शैक्षणिक माहिती भरून NEXT या बटनावर क्लिक करावे.
* यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्जसाठी लागणारे शुल्क भरावे. शुल्क भरण्यासाठी नाव, इमेल आय डी, मोबाईल क्रमांक भरून SUBMIT बटनावर क्लिक करावे.
* यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवे ओपन होईल.
* पेमेंट गेटवे ओपन झाल्यावर आपण खालील दोन पैकी कुठल्याही एका पध्दतीने शुल्क भरू शकता.
अ) आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून किंवा जर आपल्याकडे नेट बँकिंगची सोय उपलब्ध असेल तर नेट बँकिंग द्वारे शुल्क भरू शकता.
* प्रवेश शुल्क भरल्यानंतर आपल्या रजि. मोबाईल वर SMS द्वारे Receipt मिळेल व आपला प्रवेश अर्ज आपण SUBMIT बटनावर क्लिक करून SUBMIT करावा.
* प्रवेश अर्ज SUBMIT झाल्यावर आपल्या मोबाईल नंबर वर Confirmation SMS प्राप्त होईल.
* यानंतर आपण आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्म प्रत डाऊन लोड करून घेण्यासाठी POP-UP वर हा PDF सेव करा व त्याची एक प्रत काढून घ्या ही प्रत आपल्याला लेखी परिक्षेला येतांना बरोबर घेवून यावी लागेल व ती दाखवावी लागेल.
* प्रवेश अर्जामध्ये जर काही बदल, प्रवेश अर्जात राहिलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Online Admission Form वर क्लिक करावे.
* अर्जात नमुद मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकून SUBMIT बटनावर क्लिक करावे.
* माहितीत आवश्यक तो बदल करून UPDATE या बटनवर क्लिक करावे.

Online Enquiry WhatsApp Youtube