Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

+91 8047495777 | +91 8047498777

+91 9341959595 | +91 9343959595

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 7030259595 | +91 7030359595

Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 0705 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595
Round-6 Online Counselling Results: Results would be live on the portal wef 07055 hrs on 25 May 26.
blog gif Admission is closed for 5th to 10th (Boys) Only for Sambhaji Nagar.
blog gif Admissions for 2026-2027 are now open at Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595

तुम्हाला माहीत आहेत का? इंडियन आर्मी ऑफिसर्सचे वेगवेगळे युनिफॉर्म्स

भारतीय सशस्त्र दलातील जवान आणि सैनिकांचा युनिफॉर्म अभिमान, शौर्य आणि धाडसाचे प्रतीक आहे. भारतीय सेनेत सहभागी होऊन हा युनिफॉर्म परिधान करण्याचे स्वप्न अनेक युवक - युवती पाहतात. या दिशेने उज्ज्वल करिअर केल्यास त्यांचे हे स्वप्नही साकार होते. भारतीय सेनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आहेत. यामध्ये AFCAT, CDS, NDA, INET, टेरिटोरियल आर्मी आणि इतर परीक्षांचा समावेश होतो. भारतीय लष्कराचा गणवेश हा त्या अधिकाऱ्यासाठी सर्वात मौल्यवान असतो. इंडियन आर्मी बेसिक युनिफॉर्ममध्ये टोपी, पँट आणि शर्ट यांचा समावेश असतो. हा युनिफॉर्म त्या त्या भागातील वातावरणाला अनुकूल असतो. जंगलाच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यासाठी त्याची रंगसंगतीही तशीच असते. युनिफॉर्मच्या पँटमध्ये बाजू, मांड्या आणि पाठीवर खिसे असतात, तर शर्टमध्ये छातीचे दोन खिसे आणि त्यावर बटन असतात. भारतीय सैन्याचा गणवेश आठ वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागला जातो. विशिष्ट कार्यक्रमासाठी आणि विविध स्तरांतील लष्करी कर्मचारी वेगवेगळा युनिफॉर्म परिधान करतात. भारतीय सेनेचा युनिफॉर्म अभिमान, सन्मान आणि सैनिकांची देशसेवा करण्याची वचनबद्धता दर्शवतात. इंडियन आर्मी ऑफिसर्सचे वेगवेगळे युनिफॉर्म्स असे आहेत -    
 
* १) इंडियन आर्मी जनरल ड्युटी युनिफॉर्म:-
जनरल ड्युटी हा लष्करी जवानांसाठी सर्वात आकर्षक आणि औपचारिक युनिफॉर्म आहे. उन्हाळा आणि हिवाळा या दोन हंगामांसाठी भारतीय सैन्याच्या युनिफॉर्मचे दोन सेट आहेत. उन्हाळ्यात कर्मचाऱ्यांना ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट आणि पँट आणि हिवाळ्यात भारतीय सेना अधिकाऱ्यांना पीच कलरचा शर्ट (तो ज्या रेजिमेंटचा आहे त्यानुसार बदलू शकतो), काळी टाय आणि ऑलिव्ह हिरवा ब्लेझर असतो. भारतीय सेनेत या युनिफॉर्मला 5SD असे नाव दिले आहे.
* २) इंडियन आर्मी ब्लू पॅट्रोल युनिफॉर्म  :-
 त्यानंतरच्या क्रमाने ब्लू पॅट्रोल युनिफॉर्म हा भारतीय लष्कराच्या सर्व गणवेशांमध्ये सर्वात आकर्षक आणि चकचकीत आहे. हा युनिफॉर्म सहसा हिवाळ्यातील कोणत्याही समारंभासाठी परिधान केला जातो. 
* ३) इंडियन आर्मी 6A / 6B युनिफॉर्म  :-
 6A / 6B हा सामान्यत: लष्करी कर्मचाऱ्यांसाठीचा युनिफॉर्म असतो. यात काळ्या पॅन्टसह पांढरा शर्ट आणि कंबरेला पट्टा असतो. हिवाळ्यात या युनिफॉर्मवर पांढरा कोट असतो.
* ४) इंडियन आर्मी सेरेमनियल युनिफॉर्म :-
भारतीय सैन्य अधिकाऱ्यांसाठीचा सेरेमनियल युनिफॉर्म अभिमान आणि सन्मानाचे प्रतीक आहे. हा युनिफॉर्म भारतीय लष्कराचे जवान एखाद्या विशिष्ट समारंभात जसे की गार्ड ऑफ ऑनर, अंत्यविधी अशा कार्यक्रमांत परिधान करतात. हा युनिफॉर्म नियमित गणवेशाचा नसतो. मानसन्मान, पुष्पहार अर्पण आणि लष्करी अंत्यविधी यासारख्या लष्करी शैलीबद्ध समारंभांमध्ये तो परिधान केला जातो. भारतीय सैन्याचा इतिहास समृद्ध आहे आणि सेनेचा युनिफॉर्म देशाच्या परंपरा आणि मूल्ये प्रतिबिंबित करतो. युनिफॉर्म हे भारतीय लष्करी जवानांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे, ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. 
* ५) इंडियन आर्मी कॉम्बॅट युनिफॉर्म  :-

कॉम्बॅट युनिफॉर्म हा सर्वात नियमित भारतीय सैन्याचा युनिफॉर्म आहे, जो सैन्य अधिकारी परिधान करतात. त्याच्या पॅटर्नमुळे सामान्य नागरिक याला जंगल ड्रेस म्हणतात. उन्हाळ्यात अधिकारी फक्त शर्ट आणि पँट घालतात तर हिवाळ्यात जॅकेट/स्वेटरला प्राधान्य दिले जाते. शर्टाच्या कॉलरवर ऑफिसरचा दर्जा दिलेला असतो. 
*६) इंडियन आर्मी डंगरीज  :-
डंगरीज हा सर्व सैन्य अधिकाऱ्यांसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा युनिफॉर्म आहे. सामान्यतः हवाई दलात कार्यरत असलेले पायलट आणि एअरक्रू हा युनिफॉर्म परिधान करतात. यावर अधिकाऱ्याचे नाव, रँक आणि विमानाचे चिन्ह असते.
*७) इंडियन आर्मी ब्लॅक युनिफॉर्म    :-
इंडियन आर्मीचा ब्लॅक युनिफॉर्म हा भारतीय सैन्यातील सर्वात धाडसी जवानांचा युनिफॉर्म मानला जातो. सामान्यतः आर्मर्ड कॉर्प्स, NSG मधील अधिकारी आणि जवान हा युनिफॉर्म परिधान करतात. प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याला हा युनिफॉर्म मिळत नाही. कठोर परिश्रमाने आणि कर्तव्याप्रती समर्पणाने तो मिळवावा लागतो. हा युनिफॉर्म भारतीय सैन्यातील सर्वोत्कृष्ट गणवेशाचे प्रतिनिधित्व करतो. हा केवळ युनिफॉर्म नसून, भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. 
*८) इंडियन आर्मी स्मॉक्स   :-
इंडियन आर्मी स्मॉक हा असा एक भारतीय लष्कराचा युनिफॉर्म आहे जो भारतीय सैन्यात पॅराट्रूपर्स असलेले अधिकारी परिधान करतात.

Online Enquiry WhatsApp Youtube