Chhatrapati Sambhajinagar Location

Shahapur Banjār, Khojewadi Phata, AS Club to Lasur Station Road, Chhatrapati Sambhajinagar - 431002.

+91 8047495777 | +91 8047498777

+91 9341959595 | +91 9343959595

Kolhapur Location blog gif

Defence Career Academy, My school, Near Choundeshwari Cotton Mill, Sangli-Kolhapur Highway, A/P Chipri, Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

+91 7030259595 | +91 7030359595

blog gif Entrance Exam for Kolhapur is Scheduled on 19th April 2026
blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595
blog gif Entrance Exam for Kolhapur Branch is Scheduled on 19th April 2026
blog gif Admissions for 2026-2027 are now open at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches. Chhatrapati Sambhajinagar : +91 8047495777 | +91 8047498777 | +91 9341959595 | +91 9343959595 | Kolhapur : +91 7030259595 | +91 7030359595

डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : भारतीय संस्कृतीत गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याला महत्वपूर्ण स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे शिक्षक, गुरुजनांप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय सैन्यदलात विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविणारी महाराष्ट्रातील मानांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये रविवारी, २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन वंदन केले.  

              कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक आणि डिफेन्स करिअर कोच प्रा. डॉ. केदार रहाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी जीवनात गुरूचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचे असते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यानिमित्ताने सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना प्रा. डॉ. रहाणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विविध वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गुरूंविषयी प्रेम, आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी गुरूंची स्तुती करणारी गीते सादर केली. विद्यार्थिनींनी आकर्षक नृत्याद्वारे गुरुवंदना सादर केली. या कार्यक्रमास डिफेन्स करिअर अकॅडमी गर्ल्स विंगच्या संचालिका श्रीमती ऊर्मिला रहाणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. उध्दव टकले, उपप्राचार्य श्री. शशिकांत बडक यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Online Enquiry WhatsApp Youtube