स्वातंत्र्य दिन देशाचा उत्सव आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या सुर्वणक्षणांची आठवण करून देणारा हा दिवस असतो .
प्रयेक भारतीयासाठी हा दिवस मोठ्या अभिमानाचा आहे.
महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी मध्ये दरवर्षीप्रमाणेच यंदाचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाची तय्यारी DCA च्या कॅडेट्स आणि शिक्षकांनी महिनाभरापूर्वीच सुरु केली होती.
यावेळी DCA च्या सर्व कॅडेट्समध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
* अगदी सकाळीच DCA चे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि अकॅडेमीचा संपूर्ण स्टाफ हा गणवेशात DCA च्या आवारात उपस्थित होता. DCA चा परिसर पूर्णपणे देशभक्तीमय झालेला होता.
* कार्यक्रमाची सुरुवात ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
* यानंतर राष्ट्रगीत झाले आणि सर्वांनी "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम"च्या घोषणा देत भारतीय राष्ट्रध्वजास सलामी दिली.
* ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
* कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून Air Vice मार्शल श्री. अनिलजी तिवारी यांची उपस्थिती लाभली होती.
* DCA व्यवस्थापनाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे श्री. अनिलजी तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, 'आयुष्यात ध्येयपूर्तीसाठी अपार कष्ट करण्याचा आणि येणाऱ्या सर्व संकटांवर जिद्दीने मात करत ध्येयाकडे वाटचाल करण्याचा, सल्ला दिला. जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अखंड मेहनत आणि अभ्यास करीत राहण्याचेही त्यांनी सांगितले.
* त्यानंतर संस्थेचे संचालक डॉ. केदार रहाणे यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच संस्थेच्या प्रवासाबद्दल आणि आतापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल पालकांना अवगत करून दिले.
* यानंतर DCA च्या ११ वीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट अशी परेड सादर केली.
* तसेच गर्ल्स विंगच्या आणि संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
* काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दमदार वक्तृत्व केले.
* डिफेन्स करिअर अकॅडमीचे जे विद्यार्थी NDA २०२४ ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा सन्मानचिन्ह आणी चेक देऊन सत्कार करण्यात आला.
* त्याच बरोबर त्यांच्या मातांनाही 'राजमाता जिजाऊ पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
* कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. सोमीनाथजी रहाणे, संचालक प्रा. डॉ. श्री. केदार रहाणे, सचिव श्री. सचिन रहाणे, ट्रस्टी श्री. उत्तमरावजी कांबळे, डीसीए गर्ल्स विंगच्या संचालिका श्रीमती उर्मिला रहाणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. उद्धव टकले, प्रशासकीय अधिकारी श्री. रामेश्वर रहाणे, प्राचार्य श्री. सुभाष धवन, उपप्राचार्य श्री. शशिकांत बडक, उपप्राचार्य श्री. बालकृष्णन, उपप्राचार्या श्रीमती भारती मेहता, क्रीडा विभागप्रमुख श्री. निलेश माने, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
* तसेच निवृत्त मेजर श्री. सुभेदार दत्तात्रय शेजवळ, निवृत्त मेजर सुभेदार बी. बी. दळे आणि त्यांची टीम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, गर्ल्स कॅडेट्स यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
* गर्ल्स विंगच्या इकरा पठाण, वेदिका दिवेकर, जान्हवी गायकवाड, समृद्धी खाडे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
* शेवटी श्री. बालकृष्णन सर यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.