भारतीय सेनादल आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये महाराष्ट्रीय तरुण-तरुणींचे प्रमाण वाढावे आणि त्यांनी भारतीय सेनेत उज्ज्वल करिअर घडवावे, हा उद्देश घेऊन १५ वर्षांपूर्वी डिफेन्स करिअर अकॅडमीची (DCA) स्थापना झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत DCA मध्ये निडर साहसी सैनिक घडवण्याचे कार्य सुरू आहे. बलशाली राष्ट्रासाठी नव्या दमाचे सैनिक, अधिकारी घडवण्यात डिफेन्स करिअर अकॅडमीचा (DCA) मोठा वाटा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षण, सोबतच मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा, प्रशस्त क्रीडांगण, अद्ययावत जीम, लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब अशा विविध सुविधांनी परिपूर्ण असलेली डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था ठरली आहे. आज डिफेन्स करिअर अकॅडमीतील (DCA) अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी भारतीय सैन्यात निरनिराळ्या प्रमुख पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने NDA, भारतीय नौसेना, पायलट, मर्चंट नेव्ही, सरकारी नोकरी, इंडियन आर्मी, डॉक्टर, पॅरामिलिटरी फोर्स, एअरफोर्स आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात येथील विद्यार्थी कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक वर्षी DCA चा हा आलेख उंचावत जात आहे. डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक आणि डिफेन्स कोच प्रा. डॉ. केदार रहाणे सर स्वतः उच्चविद्याविभूषित आहेत. भारतीय सेनेतील विविध प्रवेश परीक्षा, निवड प्रक्रिया, पदांची रचना याविषयी त्यांचा मोठा अभ्यास आहे. महाराष्ट्राच्या मातीतील तरुणांना भारतीय सैन्यात करिअर करण्याची खूप इच्छा असते, परंतु भारतीय सेनेत दाखल कसे व्हायचे, मोठ्या अधिकारी पदांसाठी कोणकोणत्या प्रमुख परीक्षा असतात, त्यांची तयारी कशी करायची, अभ्यासक्रम कोणता, या परीक्षा केव्हा होतात, याबद्दल माहिती नसते. बहुतांश पालकांनाही याची फारशी माहिती नसते. त्यामुळे भारतीय सेनेत करिअरच्या भरपूर संधी असूनसुद्धा, युवक-युवती त्यापासून वंचित राहतात. साहसी, निडर सैनिक घडवण्यात सैनिकी प्रशिक्षण संस्थेची भूमिका महत्वपूर्ण असते.
डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन खरा नव्या दमाचा कॅडेट, सैनिक कसा घडतो, त्याच्या व्यक्तिमत्वात कसे बदल होतात, हे येथे जाणून घेऊयात. डिफेन्स करिअर अकॅडमीसारख्या सैनिकी प्रशिक्षण संस्था युवक-युवतींसाठी देशसेवा करण्याचे स्वप्न साकार करण्याचे एक आदर्श स्थान आहे. येथे विद्यार्थ्यांमध्ये कठोर शिस्त, कठोर परिश्रम आणि देशभक्तीची भावना रुजवली जाते. यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो, ज्यामुळे ते भविष्यातील सैनिक तुकडीचे नेतृत्व करण्यास सक्षम होतात.
शिस्त आणि अनुशासन
डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये (DCA) शिस्त आणि अनुशासनावर विशेष भर दिला जातो. यामुळे कॅडेट्समध्ये स्वयंशिस्त, वेळेचे महत्त्व आणि कार्यक्षमतेची भावना विकसित होते. येथे कठोर शिस्तीचे वातावरण असते. त्यामुळे कॅडेट्स स्वतःची शिस्त स्वतःच पाळण्यास शिकतात. त्यांना जीवनात वेळेचे महत्त्व कळते. प्रत्येक कृतीसाठी विशिष्ट वेळ ठरवली जाते, यामुळे वेळेचे महत्त्व समजून येते. कॅडेट्सना सोपवलेले प्रत्येक काम आणि जबाबदारी वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करण्याची क्षमता विकसित होते.
शारीरिक तंदुरुस्ती
दररोजच्या कठोर शारीरिक प्रशिक्षणामुळे कॅडेट्स शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सक्षम बनतात. त्यांच्या सैन्य कारकिर्दीसाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता येथे मिळणाऱ्या शिस्तबद्ध प्रशिक्षणातून वाढते. DCA मध्ये दैनंदिन व्यायाम, खेळ आणि विशेष शारीरिक प्रशिक्षणामुळे कॅडेट्सची शारीरिक क्षमता वाढते. पौष्टिक अन्न, योग्य आहार आणि व्यायामामुळे शारीरिक आरोग्य सुधारते. कठीण परिस्थितींना तोंड देण्याची शारीरिक क्षमता वाढते.
मानसिक दृढता
भविष्यात कुठल्याही कठीण परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता कॅडेट्समध्ये विकसित होण्यासाठी मानसिक दृढता आवश्यक आहे. DCA मध्ये कॅडेट्सला अशाच परिस्थितींना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे त्यांची मानसिक दृढता वाढते. दररोजचा अभ्यास, वाचन, खेळांचा सराव तसेच कठीण परीक्षा, स्पर्धा आणि शारीरिक प्रशिक्षणामुळे मानसिक दृढता वाढते. दैनंदिन प्रशिक्षणाद्वारे तणावपूर्ण परिस्थिती कशी हाताळायची याचे परिपूर्ण ट्रेनिंग मिळते. कॅडेट्समध्ये यशस्वी कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढतो.
नेतृत्व गुण
DCA मध्ये कॅडेट्सना नेतृत्वाच्या विविध संधी दिल्या जातात. यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होतात, ज्यामुळे ते भविष्यात नेतृत्व करण्यास सक्षम होतात. DCA कॅडेट्सना विविध स्पर्धा, पथकांमध्ये नेतृत्व करण्याच्या संधी मिळतात. त्यामुळे त्यांच्यात निर्णय क्षमता वाढते. स्वतःचे आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या सहकाऱ्यांचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. यामुळे त्यांच्यात संवाद कौशल्य वाढते. प्रभावीपणे संवाद कसा साधायचे याचे प्रशिक्षण मिळते.
देशभक्तीची भावना
दररोजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणातून आणि कठोर प्रशिक्षणातून कॅडेट्समध्ये देशप्रेम, देशभक्तीची भावना रुजवली जाते. आपणही देशासाठी काही तरी करायला हवे, ही नवी प्रेरणा कॅडेट्सला मिळते. DCA मध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि परंपरा यातून देशभक्तीची भावना रुजवली जाते.