महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षण घेऊन अनेक कॅडेट्सनी आपले भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. DCA चे अनेक कॅडेट्स आजघडीला सैन्यदलात सामील भारतमातेच्या रक्षणाची महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. पाल्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच अपूर्व असेच आहे. आई-वडिलांना अभिमान वाटावा असे उज्ज्वल करिअर घडविण्याचे कार्य डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये सुरु आहे. DCA च्या यशवंत कॅडेट्सच्या पालकांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना...!
श्री. विजय पाटील आणि श्रीमती रेणुका विजय पाटील :
आमचा मुलगा प्रथम पाटील याची एअर फोर्समध्ये मेडिकल असिस्टंट म्हणून निवड झाली आहे. वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच डिफेन्स सेक्टरमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने DCA ची जाहिरात बघितली आणि DCA मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. प्रथम अभ्यासात हुशार असल्याने आमचा त्याला आधीपासून पाठिंबा होता. त्यामुळे आम्हीदेखील DCA बद्दल विचारपूस करून प्रवेशाबद्दल माहिती काढली. DCA मध्ये जाऊन आम्ही इथला स्टाफ, वातावरण, शिक्षणपद्धती इत्यादी सर्व बाबींची नीट पडताळणी केल्यानंतर आम्हाला DCA बद्दल खात्री पटली. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथमने अर्ज केला आणि परीक्षा दिली. तो प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि इयत्ता ९वीसाठी त्याने DCA मध्ये प्रवेश मिळवला. इथे आल्यानंतर त्याला डिफेन्सबद्दल नवनवीन माहिती मिळाली. भारतीय सेनेत जाण्यासाठी केवळ NDA हाच एक पर्याय नसून, इतरही अनेक पर्याय आहेत, हे आम्हाला DCA मध्ये आल्यानंतर समजले. दर्जेदार शिक्षणासोबतच इथे त्याला आरोग्यदायी वातावरण, पौष्टिक अन्न, शारीरिक प्रशिक्षण अशा सर्व गोष्टी मिळाल्या. इथल्या शिक्षकांनी त्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी तयार केले. तो NDA ची लेखी परीक्षा उत्तीर्ण करून ट्रेनिंगसाठी भोपाळला गेला आहे. DCA मध्ये येण्याचा आमचा निर्णय अगदी योग्य होता !
श्रीमती मीनाक्षी स्वामी :
माझा मुलगा महादेव स्वामी. त्याला आधीपासूनच देशसेवा करण्याचं वेड होतं. करिअर करायचं तर डिफेन्समध्येच, हीच त्याची जिद्द होती. स्वप्नांचा पाठलाग करत तो DCA पर्यंत पोहचला आणि येथे खऱ्या अर्थाने त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. तो DCA मध्ये शिकला, विकसित झाला आणि घडला...! DCA मुळे त्याला योग्य दिशा मिळाली. तो प्रयत्न करत राहिला आणि NDA मध्ये उत्तीर्ण झाला. तो मला म्हणायचा, "आई मी ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवणारच !" त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्याची मेहनत आणि DCA च्या मार्गदर्शनाने तो आज भोपाळमध्ये ट्रेनिंगसाठी गेला आहे. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे. आम्ही DCA चेही आभारी आहोत.
श्रीमान आणि श्रीमती मडावी :
आमची मुलगी श्रावणी मडावी हिने २०२२ ला DCA मध्ये प्रवेश घेतला. श्रावणीला शाळेत असल्यापासूनच NDA मध्ये जाण्याची इच्छा होती. यासाठी ती इंटरनेट आणि युट्युबच्या माध्यमातून NDA मध्ये जाण्यासाठीची माहिती मिळवत होती. तिने अनेक कॉलेज शोधले आणि शेवटी DCA मध्ये ऍडमिशन घेण्याचे ठरवले. तिच्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले आणि ११वी साठी तिचा प्रवेश DCA मध्ये झाला. येथे आल्यानंतर परीक्षेसाठी तिचा सखोल अभ्यास झाला. नंतर तिने NDA ची परीक्षा दिली आणि JEE मेन्समध्येही उत्तीर्ण झाली. श्रावणीचे पालक म्हणून आम्हाला आज खूप गर्व वाटतो. धन्यवाद DCA !
श्रीमती अनिता पाटणकर :
माझा मुलगा कुणाल पाटणकर याने NDA ची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि नुकताच त्याचा interview सुद्धा पार पडला. त्याला पूर्वीपासूनच NDA मध्ये जाण्याची आवड होती. त्याच दिशेने तो प्रयत्न करत गेला. या प्रवासात त्याला DCA ची महत्वपूर्ण साथ लाभली. हे कॉलेज खरच खूप छान आहे. सगळे शिक्षक योग्य मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करतात. DCA मुळे आज माझ्या मुलाचे भविष्य घडले आहे. DCA चा संपूर्ण स्टाफ, शिक्षक, मार्गदर्शक या सर्वांचे मनापासून आभार...!
DCA कॅडेट आदित्य लाड याची आई :
DCA मध्ये सगळ्या सुविधा अगदी व्यवस्थित आहेत. आपला मुलगा इतक्या लांब राहतो म्हणून काळजी होती परंतु इथे आल्यानंतर सगळी चिंता मिटली. इथले वातावरण, सुविधा बघून आणि पालकांसारखे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना भेटून मुलगा योग्य ठिकाणी होता, याची खात्री पटली.
सर्व शिक्षक चांगले आहेत. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि घडण्यासाठी सगळ्या सुविधा इथे आहेत. DCA चे मनःपूर्वक आभार...!