भारतीय सैन्यदलात प्रमुख तीन शाखा आहेत, त्या म्हणजे भारतीय सेनादल, भारतीय नौकादल आणि भारतीय वायुदल. महत्वाकांक्षी आणि मेहनती तरुण-तरुणींना या तीनही दलांमध्ये उज्ज्वल करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यातही वायुदलात सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. भारतीय वायू सेना म्हणजेच Air Force. भारतीय वायुदल हे आयएएफ म्हणूनदेखील ओळखले जाते. या क्षेत्रात जाण्याची अनेकांची इच्छा असते. तसेच वायू सेनेत जाण्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याचीही तयारी असते. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वोत्तम सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी (DCA) आपल्या विद्यार्थ्यांकडून NDA परीक्षेचा व्यवस्थितपणे अभ्यास करून घेते. DCA चे अनेक विद्यार्थी NDA परीक्षा उत्तीर्ण करून आज भारतीय वायुदलात उच्च पदांवर कार्यरत आहेत. इंडियन एअर फोर्समध्ये सेवा करण्याचे दोन भाग असतात. हे X ग्रुप आणि Y ग्रुप यामध्ये विभागले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, भारतीय वायू सेनेत भरती होण्यासाठी प्रवेश पात्रता, शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल...
एक्स ग्रुपसाठी शैक्षणिक पात्रता :
- एक्स ग्रुप इंडियन एअर फोर्सचा टेक्निकल ग्रुप आहे.
- यासाठी १२वी पास असणे आवश्यक आहे.
- गणित, फिजिक्स आणि इंग्रजी या विषयांमध्ये ५०% गुण आवश्यक असतात.
- याव्यतिरिक्त ३ वर्षाचा पॉलिटेक्निक डिप्लोमा सर्टिफिकेट असणाऱ्यांनासुद्धा अर्ज करता येतो.
एक्स ग्रुपसाठी शारीरिक पात्रता :
- उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निकोप असावा.
- सैनिकी पदांसाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता
- एक्स ग्रुपसाठी परीक्षेची वेळ फक्त ६० मिनिटे राहील. यात इंग्लिश, फिजिक्स आणि गणित सीबीएसई १०+२ लेवल यांचा समावेश असेल.
वाय ग्रुपसाठी शैक्षणिक पात्रता :
- यासाठी १०+२ मध्ये ५० टक्के गुण असावेत.
- इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- २ वर्षांची व्होकेशनल डिग्री असावी.
- या कोर्समध्ये किमान ५० टक्के गुण असावेत.
वाय ग्रुपसाठी शारीरिक पात्रता :
- उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निकोप असावा.
- सैनिकी पदांसाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता
- वाय ग्रुपसाठीच्या परीक्षेचा वेळ ४५ मिनिटे राहील. यात मातृभाषा, इंग्रजी आणि जीए या विषयांचा समावेश असेल.
NDA परीक्षेमार्फत वायू सेनेत जाण्यासाठी :
- NDA च्या माध्यमातून भरती झाल्यास उच्च पद प्राप्त होते.
- विज्ञान विषयात फिजिक्स आणि मॅथ्स असे दोन्ही विषय असणे गरजेचे आहे.
- किमान ६० टक्के गुण असायला हवेत.
- UPSC अंतर्गत ही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते.
शैक्षणिक पात्रता :
- १०+२ मध्ये विज्ञान शाखेत फिजिक्स आणि मॅथ्ससह ६० टक्के गुण असावेत.
- १२ वीमध्ये असणारे विद्यार्थीदेखील ही परीक्षा देऊ शकतात.
- उमेदवार अविवाहित असावा.
- उमेदवाराचे वय १६.५ आणि अधिक १९.५ वर्षे असावे.
शारीरिक पात्रता :
- उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निकोप असावा.
- सैनिकी पदांसाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता
परीक्षेची रूपरेषा :
- ही परीक्षा ९०० गुणांची असते.
- मॅथ्स आणि जनरल एबिलिटी हे दोन विषय असतात.
- दोन्ही विषयांमध्ये अडीच तासांचा कालावधी असतो.
- हा पेपर निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा असतो.
- यात गणित विषयासाठी ३०० गुण आणि जनरल एबिलिटीसाठी ६०० गुण असतात.
डिफेन्स करिअर अकॅडमी ही संस्था Air Force मध्ये भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करवून घेते. DCA मध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी नियमितपणे आवश्यक सराव करून घेतला जातो. विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. ज्यामुळे विद्यार्थी वायू सेनेत जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतो.