Blog - Defence Career Academy
Kolhapur Location New

Defence Career Academy ,My school ,Near Choundeshwari Cotton Mill, Sangli- Kolhapur Highway, A/P Chipri. Tal, Shirol, Dist, Kolhapur, Maharashtra 416101

Chhatrapati Sambhajinagar Phone

080 474 95777    | 080 474 98777
+91 9341959595 | +91 9343959595


Admissions Closed- Please note that admissions for all classes are now closed at both Chhatrapati Sambhaji Nagar and Kolhapur branches.
blog Images

डिफेन्स करिअर अकॅडमीसोबत SSB Interview मध्ये मिळवा उत्तुंग यश !

07 February 2025

भारतीय सैन्यदलात प्रवेश करून धाडसी कामगिरी करण्याचे स्वप्न अनेक युवक-युवती पाहतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकदा त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. इंडियन आर्म फोर्समध्ये अधिकारी व्हायचे असेल, तर त्यातही अनेक संधी आहेत. निरनिराळ्या परीक्षा आहेत. इंडियन आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये अधिकारी पदापर्यंत पोहचायचे असेल, तर प्रत्येक धाडसी कॅडेटला SSB Interview हा अत्यंत कठीण समजला जाणारा अडथळा पार करावा लागतो. या मुलाखतीमध्ये जो उमेदवार यशस्वी होतो, तो पुढील काळात आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकतो. त्यामुळे या टप्प्याला अत्यंत महत्व दिले गेले आहे. SSB Interview ही भारतीय सशस्त्र दलांमध्ये अधिकारी पदांसाठी असलेली निवड प्रक्रिया आहे. SSB चा अर्थ आहे 'सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड'. भारतीय सेनेच्या तिन्ही शाखांसाठी (थलसेना, नौदल, वायुसेना) SSB Interview हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेद्वारे कॅडेट्समधील नेतृत्व कौशल्य, टीमवर्क, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक दृढता आणि राष्ट्रसेवेची इच्छाशक्ती या गुणांचे मूल्यमापन केले जाते. SSB चे दोन टप्पे आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात Officer Intelligence Rating (OIR) टेस्ट यात व्हर्बल आणि नॉन-व्हर्बल टेस्ट असतात. Picture Perception and Discussion Test (PPDT). त्यानंतर गटचर्चा अर्थात Group Discussion चा भाग असतो. दुसऱ्या टप्प्यात मानसिक चाचण्या असतात. यात Thematic Apperception Test (TAT) चित्रांवर आधारित कथा लिहिणे, Word Association Test (WAT) शब्दांची नीट जोडणी करणे, Situation Reaction Test (SRT) परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावर आधारित कृती करणे, Self Description Test (SDT) स्वतःची माहिती सांगणे, Group Testing Officers (GTO) Tasks आणि Discussion. यात Group Planning Exercise (GPE) असतात. Progressive Group Task (PGT) मध्ये एकमेकांना मदत करून अडथळे पार करावे लागतात. Lecturette यामध्ये दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करावे लागते. त्यानंतर होतो SSB Interview. ही एक संवादात्मक प्रक्रिया असते. यात कॅडेट्सच्या व्यक्तीमत्त्वाचा, अनुभवांचा आणि दृष्टिकोनाचा अंदाज घेतला जातो. यात तुमच्या आवडीनिवडी, प्लस-मायनस पॉईंट्स, तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना कसा करता, हे पाहिले जाते. SSB Interview ही प्रक्रिया ५ दिवसांपर्यंत चालते आणि यात विविध चाचण्यांचा समावेश असतो, 
*  स्क्रीनिंग चाचणी (Screening Test) : यात मौखिक आणि लेखी परीक्षांचा समावेश असतो.
*  मानसशास्त्रीय चाचण्या (Psychological Tests) : यात विविध मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून उमेदवारांच्या मानसिकतेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते.
*  गट चाचण्या (Group Tests) : यात उमेदवारांना गटांमध्ये विविध कार्ये दिली जातात आणि त्यांच्यातील नेतृत्व क्षमता, टीम वर्क आणि संवाद कौशल्ये तपासली जातात.
*  वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) : यात सैनिकी अधिकारी उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, विचारांचे आणि ज्ञानाचे मूल्यांकन करतात.
*  कॉन्फरन्स (Conference) : या शेवटच्या टप्प्यात सर्व चाचण्यांच्या आधारावर उमेदवारांची अंतिम निवड केली जाते.

भारतीय सेनादलाच्या परीक्षा आणि SSB Interview ची 
तयारी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :
*  परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.
*  मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा.
*  शारीरिक चाचण्यांसाठी नियमित व्यायाम करा.
*  आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
*  या क्षेत्रातील अनुभवी संस्था, मार्गदर्शक व्यक्तींकडून योग्य सल्ला घ्यावा. त्यातून आखणी करावी. तुम्ही हा अत्यंत कठीण समाजाला जाणारा अडथळा नक्कीच पार करू शकाल. 
महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये कॅडेट्सकडून SSB ची सर्व तयारी करून घेतली जाते. त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर रिटायर्ड आर्मी स्टाफ, फिजिकल ट्रेनर, मेंटॉर हे सगळे कॅडेट्सच्या सोबत असतात. उज्ज्वल करिअरसाठी तुम्हा सर्वांना डिफेन्स करिअर अकॅडमीकडून हार्दिक शुभेच्छा !