भारतीय सैन्यदलात करिअर करण्याचे अनेक युवक-युवतींचे स्वप्न असते. सैन्यात जाऊन देशसेवा करण्यासाठी तरुण अतिशय उत्सुक असतात. या क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण तर असते, परंतु NDA मध्ये प्रवेश कसा मिळवायचा, याची सविस्तर माहिती अनेकांना नसते. युवक - युवतींच्या मनातील शंका, प्रश्न दूर करणारी, तसेच त्यांना भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी सखोल मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी. NDA प्रवेशापासून ते भारतीय सैनिकी सेवेत सर्वोच्च करिअर करण्यासाठी डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये (DCA) संपूर्ण तयारी करून घेतली जाते. गेल्या १५ वर्षांपासून हजारो युवक-युवतींचे बलशाली भारतीय सेनेमध्ये उज्ज्वल करिअर घडविण्याचे स्वप्न डिफेन्स करिअर अकॅडमीने (DCA) पूर्ण केले आहे. सर्वात आधी जाणून घेऊया NDA म्हणजे काय? NDA साठी पात्रता काय? आणि NDA मध्ये भरतीसाठी कोणते निकष आवश्यक आहेत? NDA प्रवेशाची संपूर्ण माहिती.
NDA म्हणजे काय?
NDA म्हणजे National Defence Academy. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी NDAची परीक्षा देतात. वायुसेना (Air Force), नौसेना (Navy) आणि भारतीय सेना (Indian Army) मध्ये भरती होण्यासाठी NDA ची परीक्षा देणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ पुरुष उमेदवारच ही परीक्षा देण्यासाठी पात्र होते, परंतु आता नवीन बदलानुसार महिलांसाठीही ही परीक्षा लागू करण्यात आली आहे. NDA ची प्रवेश परीक्षा ही वर्षातून दोनवेळा घेण्यात येते. ज्यास NDA -१ आणि NDA-२ म्हणतात. पहिली अधिसूचना जानेवारीमध्ये जाहीर करण्यात येते आणि पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्याच्या जवळपास घेण्यात येते. दुसऱ्या परीक्षेची अधिसूचना जूनमध्ये जाहीर करण्यात येते आणि त्यानंतर प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC द्वारे घेण्यात येते.
NDA साठी पात्रता :
- NDA साठी पात्रता अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे भारत, नेपाळ किंवा भूतान या देशांचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- सेनेत भरती होण्यासाठी उमेदवार राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत १०+२ पॅटर्नप्रमाणे १२वी पास असावा.
- वायुसेना आणि नौसेनेत भरती होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत १०+२ DCM पॅटर्नप्रमाणे १२ वी पास असावा.
शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता :
- उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निकोप असावा.
- उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा रोग, सिंड्रोम किंवा अपंगत्व असू नये.
- उमेदवाराचे वय १६.१/२ ते १९.१/२ असावे.
परीक्षेची रूपरेषा :
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDAच्या प्रवेशामध्ये लेखी, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी यांचा समावेश असतो.
- लेखी परीक्षेमध्ये २ पेपर घेतले जातात.
- यात गणित आणि सामान्य क्षमता चाचणी हे विषय असतात.
- लेखी परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अंतर्गत असलेली पदे :
- कॅप्टन
- लेफ्टनंट
- मेजर
- लेफ्टनंट कर्नल
- मेजर जनरल
- COAS
- HAG
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये प्रवेश घेण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील एकमेव नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी सर्वोत्तम आहे. महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था असलेल्या डिफेन्स करिअर अकॅडमीला विशाल इमारत आणि सोबतच १२ एकरांवर पसरलेला विस्तीर्ण कॅम्पस लाभला आहे. DCA मध्ये उज्ज्वल कारकीर्दीची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानार्जन करण्यासाठी सर्वात प्रगत आणि सुनियोजित शिक्षण प्रणाली प्रदान केलेली आहे. DCA मध्ये प्रत्येक कॅडेटकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाते. कॅडेट्सचा सर्वांगीण विकास, सैन्यदलातील निवडीसाठी आवश्यक प्रशिक्षण तसेच आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. येथे अत्यंत नियोजनबद्ध प्रशिक्षणातून कॅडेट्समधील अधिकारी घडविला जातो. शालेय शिक्षणापासूनच सैन्यदलातील अधिकारी घडविण्याचे कार्य डिफेन्स करिअर अकॅडमीद्वारे निरंतर सुरु आहे. DCA मध्ये पाल्यांना सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोन्ही माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि निवासासाठी मुला-मुलींकरिता स्वतंत्र व्यवस्था आहे. मुलींसाठी थेट पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा आहे. DCA मध्ये शिक्षण घेणाऱ्या निवासी कॅडेट्ससाठी सुसज्ज हॉस्टेल आहे.